राजकीय
जागेच्या वाटाघाटीवरून राहुल गांधी नाराज?
- महाविकास आघाडीच्या जागावाटपचा तिढा सुटला आहे, असा दावा खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. पण, त्यांच्या दाव्याला धक्का देणारी मोठी घटना काल नवी दिल्लीत घडली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडलेल्या जागेवरुन नाराज आहेत.
- कांग्रेस नेत्यांनी वाटाघाटी करताना योग्य भूमिका पार पाडली नसल्याचे मत राहुल यांनी व्यक्त केले. राहुल यांनी फक्त हे मत व्यक्त केले नाही तर ते काँग्रेसच्या निवडणूक समितीच्या बैठकीतून अर्ध्यातून बाहेर पडले, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
- मुंबई आणि विदर्भातील जागा ठाकरे गटाला सोडल्यामुळे राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त केली. काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्याला जागा वाटप करण्यासाठी पाठविले होते. त्यात विदर्भ आणि मुंबईतील काही जागा ठाकरे गटाला सोडल्याबद्दल राहुल यांनी नाराजी सर्वांसमोर व्यक्त केली आहे.
- दरम्यान, महाविकास आघाडीत 2 ते 3 जागांवर अजूनही चर्चा सुरु आहेत. बाळासाहेब थोरात हे शनिवारी उद्धव ठाकरेंची भेट घेतील. शरद पवार यांचे पत्र आलेले आहे. त्यामुळे शनिवारी आमची ऑनलाईन CEC होईल आणि दुसरी यादी येईल, असे स्पष्टीकरण काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी दिले आहे.