राजकीय

ब्रेकिंग! महाराष्ट्रात कोण होणार मुख्यमंत्री? आला सर्व्हे

  • राज्यात पुढील महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या दृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी केली जात आहे. दरम्यान, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार, जर महाविकास आघाडीची सत्ता आली तर मुख्यमंत्री कोण आणि महायुतीची सत्ता आली तर मुख्यमंत्री कोण हे अजूनही गुलदस्त्यात आहे. याबाबत अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत. याबाबत लोकनीती-सीएसडीएसने याबाबत सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात लोकप्रिय मुख्यमंत्री उमेदवारांवर लोकांना प्रश्न विचारण्यात आले. सर्वेक्षणात लोकांची उत्तरे प्राप्त झाली आहेत.
  • काय सांगतो सर्व्हे-
  • लोकनीती सीएसडीएसच्या सर्वेक्षणात, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, शरद पवार आणि अजितदादा पवार हे मुख्यमंत्रीपदाचे लोकप्रिय दावेदार म्हणून लोकांना त्यांचे मत विचारण्यात आले.
  • उद्धव ठाकरे हे सर्वेक्षणात अव्वल असून त्यांना 28 टक्के लोकांनी मुख्यमंत्रीपदासाठी लोकप्रिय उमेदवार मानले आहे. अहवालानुसार, 20 टक्के लोकांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाला पसंती दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांना 16 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. 8 टक्के लोकांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना मान्यता दिली आहे. 3 टक्के लोकांनी अजितदादा यांना मुख्यमंत्रीपदासाठी पसंती दिली आहे. मात्र महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची लोकप्रियता एकत्र केली, तरी महाविकास आघाडीपेक्षा महायुतीला मिळालेल्या पसंतीपेक्षा जास्त आहे.

Related Articles

Back to top button