खेळ
ब्रेकिंग! न्यूझीलंडचा करेक्ट कार्यक्रम
- टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन कसोटी सामन्यातील दुसरा सामना आजपासून पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सुरु झाला आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी वॉशिंग्टन सुंदरने दमदार कामगिरी करत 59 धावांत सात विकेट घेतले. कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा वॉशिंग्टनने एका डावात सात विकेट घेतले आहे.
- न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून प्रथम फलदांजीचा निर्णय घेतला होता मात्र आर. अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदरने शानदार गोलंदाजी करत न्यूझीलंडचा पहिला डाव 259 धावांवर आटोपला. न्यूझीलंडकडून कॉनवेने 76 आणि रचिन रवींद्रने 65 धावा केल्या. मात्र त्यानंतर एकही फलंदाज जास्त वेळ क्रीझवर राहू शकला नाही.
- तर दुसरीकडे टीम इंडियाची पहिल्या डावाची सुरुवात देखील खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. रोहितला टीम साऊदीने क्लीन बोल्ड केले. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने पहिल्या डावात 16 धावा केल्या आहेत.