महाराष्ट्र
मोठी बातमी! सुप्रीम कोर्टाचा राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना तगडा इशारा
- सुप्रिम कोर्टात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हाच्या मुद्द्यावर सुनावणी पार पडली. यावेळी अजितदादा पवारांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला. लाजिरवाणी परिस्थिती निर्माण करू नका, असे सुप्रिम कोर्टाने म्हटले. आता विधानसभा निवडणुकीसाठी अजितदादा यांच्या पक्षाला घड्याळ हे चिन्ह वापरता येणार आहे. परंतु, त्यासाठी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक आहे. अन्यथा कारवाई करू, असा कडक इशारा हायकोर्टाने अजितदादा यांना दिला आहे.
- दरम्यान कोर्टाने शरद पवार आणि अजित पवार या दोघांनाही निर्देशांचे पालन करा. अन्यथा न्यायालयाच्या अवमानाचा ठपका ठेऊ, असा इशारा दिला. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता सहा नोव्हेंबर रोजी होईल, असे जाहीर केले. आता अजितदादा यांना घड्याळ चिन्ह वापरताना हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, असे लिहावे लागणार आहे. अजित पवारांना शरद पवारांनी दाखल केलेल्या अर्जावर आणि कोर्टाच्या निर्देशावर प्रतिज्ञापत्र देखील द्यावे लागणार आहे.