राजकीय

ब्रेकिंग! काँग्रेसचा मास्टरस्ट्रोक, ‘लाडकी बहीण’ला ‘महालक्ष्मी योजने’ने उत्तर

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग झाला आहे. सर्वच राजकीय पक्षाला निवडणुकीची तयारी केली जात आहे. राज्यात सत्ता प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांना आज दिल्लीत बोलवण्यात आले आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेसची बैठक सुरु झाली आहे. या बैठकीमध्ये जाहीरनामा, जागावाटपावर चर्चा होणार असल्याचे समजते. काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीसाठा आपला जाहीरनामा तयार केला आहे. त्यामध्ये महायुतीच्या लाडकी बहीण योजनेला उत्तर देण्यात येणार असल्याचे दिसते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसने महाराष्ट्रासाठी महालक्ष्मी योजना आखली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना प्रति महिना दोन हजार रुपये देण्याची योजना काँग्रेसने आखली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस नेत्यांची दिल्लीत बैठक सुरु झाली आहे. राज्यातील काँग्रेसचे प्रमुख सहा नेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा करत आहेत. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथल्ला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, वर्षा गायकवाड या बैठकीला उपस्थित आहेत. या बैठकीत जाहीरनाम्यावर चर्चा होणार आहे. 

Related Articles

Back to top button