देश - विदेश
ब्रेकिंग! पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो

- भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आज राष्ट्रीय सुरक्षा समितीची एक बैठक आयोजित केली आहे. या बैठकीनंतर पाकिस्तानही कठोर प्रतिक्रिया देईल असे सांगण्यात आले. पाकिस्तानने नौदलालाही अलर्ट मोडवर ठेवले आहे. पाकिस्तानला अशी भीती वाटत आहे की भारत एखाद्या कारवाईत नौदलाचा वापर करू शकतो. यामुळेच पाकिस्तान सरकारने दोन दिवसांची फायरिंग वॉर्निंग जारी केली आहे. दरम्यान आज पाकिस्तान रात्रभर दहशतीत आहे. कारण त्याने १८ लढाऊ विमाने एलओसीवर ठेवली आहेत.
- पहलगाम येथे दहशतवाद्यांकडून झालेल्या भीषण हत्याकांडानंतर आता केंद्र सरकारने कडक पाऊले उचलली आहे. या धर्तीवर भारताने पाकिस्तानची कोंडी करण्याची तयारी सुरु केली आहे. तर दुसरीकडे वायूसेनेने ‘आक्रमण’ नावाने युद्धाभ्यास सुरु केला आहे.
- पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करत 26 भारतीय नागरिकांचे जीव घेतले अत्यंत अमानुषपणे केलेल्या या कृत्याची जगात निंदा होत आहे. अशातच भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधु जलकरार स्थगित केला आहे आणि त्यासोबतच व्हिजावर असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात 48 तासात परत जाण्याचे निर्देश दिले आहेत. भारताने उचलेल्या कडक पावलांमुळे पाकिस्तानचा तीळपापड झाला आहे.



