क्राईम

बिग ब्रेकिंग! बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांची काल रात्री उशीरा हत्या करण्यात आली. या गोळीबारप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून बिश्नोई गँगचा हात असल्याची माहिती चौकशीतून समोर येत आहे. 

सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी धर्मराज राजेश कश्यप आणि गुरुनैल सिंग या दोघांना अटक करण्यात आली आहे. तसेच गोळीबार करणार तिसरा आरोपी शिवानंद हा फरार असून क्राईम ब्रँच त्याच्या मागावर आहे. 

तसेच या गोळीबारप्रकरणी मोहम्मद झिशान अख्तर असे चौथ्या आरोपीचे नाव समोर येत आहे. अटकेत असलेले दोन्ही बिश्नोई गँगशी संबंधित असून पोलिसांनी त्यांची कसून चौकशी पोलिसांनी केली आहे. 

धर्मराज याचे वय 19 वर्षे असून दुसरा आरोपी गुरुनैल सिंग हा 23 वर्षांचा आहे. या दोघांची आज मुंबईतील जीटी रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली आणि त्यानंतर दोघांना किला कोर्टात हजर करण्यात आले. 

किला कोर्टात 19 वर्षीय आरोपी धर्मराज याने न्यायाधीशांसमोर आपले वय 17 वर्षे असल्याचा दावा केला. यानंतर कोर्टाने त्याच्याकडे आधारकार्डची विचारणा केली. तसेच आधारकार्ड येईपर्यंत कोर्टाची सुनावणी थांबवण्यात आली. मात्र त्यानंतर पुढच्या पाच मिनिटात धर्मराज याच्याकडे आधारकार्ड सापडले. त्यात त्याचे वय 19 वर्षे असल्याचे निदर्शनास आले. यानंतर सरकारी वकिलांनी आरोपीचे वय ग्राह्य धरून आम्हाला त्याची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली.

यानंतर किला कोर्टाने गुरुनैल सिंगला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, तर धर्मराज याची वयाची टेस्ट करण्याची सूचना पोलिसांना दिल्या आहेत. पोलीस ही टेस्ट करून आरोपीला पुन्हा किला कोर्टात हजर करणार आहेत. तोपर्यंत आरोपी धर्मराज पोलिसांच्या ताब्यात राहणार आहे.

Related Articles

Back to top button