क्राईम

बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर बिश्नोई गँग चर्चेत

काल रात्री मुंबईत माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर ही हत्या कुणी आणि का केली याबद्दल अनेक तर्क-वितर्क लावले जात असतानाच आता यामध्ये मोठी अपडेट समोर आली आहे. या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने स्वीकारली आहे.

अभिनेता सलमान खानला तुझ्यामुळे अनुज थापनचे नुकसान झाल्याचे लॉरेन्स गँगने सांगितले. या घटनेनंतर पुन्हा एकदा बिश्नोई गँग चर्चेत आली आहे.

पंजाबमधील फिरोजपूर 12 फेब्रुवारी 1993 रोजी जन्मलेला लॉरेन्स बिश्नोईचा जन्म झाला. लॉरेन्सचे वडील 1992 मध्ये हरियाणा पोलिसात कॉन्स्टेबल म्हणून रुजू झाले. मात्र पाच वर्षांनी नोकरी सोडून त्यांनी शेती सुरू केली. लॉरेन्सने पंजाब विद्यापीठातून एलएलबी पूर्ण केले आहे. 2009 मध्ये शिक्षणादरम्यान तो पंजाब विद्यापीठाच्या एका विद्यार्थी संघटनेत सामील झाला. त्यादरम्यान त्यांनी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष गोल्डी ब्रार याच्याशी भेट झाली.

गोल्डीला भेटल्यानंतर आणि विद्यापीठाच्या विद्यार्थी राजकारणात सामील झाल्यानंतर बिष्णोईची पावले गुन्हेगारीच्या जगाकडे वळला. तो बेकायदेशीर कामात अडकू लागला. जवळपास दोन दशकांनंतर, लॉरेन्स बिश्नोई हा एक गुन्हेगारी जगतातला चेहरा म्हणून ओळखला जाऊ लागला.

लॉरेन्स बिश्नोई टोळी देशातील सर्वात मोठी टोळी बनली आहे. या टोळीत सातशे शूटर्स आहेत. लॉरेन्स बिश्नोई टोळीचे जाळे देशभर पसरले आहे. या टोळीचे गुंड पंजाब, दिल्ली, हिमाचल प्रदेश आणि राजस्थानमध्ये सक्रिय आहेत. ही टोळी कॅनडा आणि दुबईतूनही कार्यरत आहे.

लॉरेन्स बिश्नोई टोळीचे तीन साथीदार, रोहित गोदारा, संपत नेहरा आणि वीरेंद्र चरण हे गुन्हे नियोजन, पैशाचा हिशेब आणि शस्त्रास्त्रे पुरवण्याची जबाबदारी सांभाळतात.सुखदेव सिंग गोगामेडी हत्याकांडातही लॉरेन्स बिश्नोई टोळीचा हात असल्याचे बोलले जाते.लॉरेन्स बिश्नोईवर सलमान खानवर दोनदा हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप आहे. लॉरेन्स बिश्नोईवर सिद्धू मूसवाला यांच्या हत्येचाही आरोप आहे.

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई सध्या साबरमती मध्यवर्ती कारागृहातील उच्च सुरक्षा वॉर्डमध्ये ठेवण्यात आला आहे. पण त्याने आपले जाळे अशा प्रकारे पसरवले की तो तुरुंगात असो की बाहेर याने त्याला फारसा फरक पडत नाही. याचा अर्थ असा की, तुरुंगात बसून तो अगदी सहजतेने वाटेल ते करतो. तुरुंगात बसून तो आपल्या शत्रूंच्या नावे कंत्राटे घेतो आणि तुरुंगात बसून करोडो रुपये वसूल करतो. एनआयएच्या चौकशीदरम्यान, त्याने त्याच्या कामाची संपूर्ण मोडस ऑपरेंडी आणि त्यातील प्रत्येक सत्य उघड केले होते.

Related Articles

Back to top button