महाराष्ट्र
ब्रेकिंग! मला एक खून माफ करा…
- मनसेचा राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा मुंबईतील गोरेगाव येथे आज पार पडला. या मेळाव्यातून मनसेच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर सुद्धा भाष्य केले आहे.
- राज म्हणाले, निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होतील. आज आपल्याकडे अनेकांनी पक्षात प्रवेश केला आहे. ही सुरुवात आहे. पुढे-पुढे पहा काय-काय गोष्टी घडतात. हल्ली ते स्वागताचे हार पाहिले तर पहिली धडकी भरते. चुकून एखादा अजगर गळ्यात घालायचे. केवढे मोठे ते हार.आता तर जेसीबीला लावून हार आणतात. मध्यंतरी मी दौऱ्यात होतो, तेव्हा जेसीबीने अख्क्या गाडीवर हार घातला. पण ड्रायव्हरने गाडी चालवायची कशी? उत्साह, प्रेम मी समजू शकतो. पण जरा हे आटोक्यात आणा.
- राज ठाकरेंनी पुढे म्हटले, महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना अनेक ठिकाणी फिरलो. अनेकांनी माझ्या भेटीगाठी घेतल्या. अनेकजण भेटायला आले. पण सर्वांना भेटता आले नाही. काहींना माझ्यासोबत फोटो काढायचे होते. माझी राष्ट्रपतींकडे एक विनंती आहे. मला एक खून माफ करा. एक खून. ज्याने मोबाईलमध्ये कॅमेरा आणला ना. त्याचा मला खून करायचा आहे. सर्वांना फोटो देणे शक्य होत नाही ओ. एकाने माझ्या अगदी नाकाजवळ कॅमरा आणला. मी म्हटले काय नाकातले केस काढायचे आहेत का?
- कित्येक पदाधिकारी तर मी पाहतो. वर्धापनदिन असला तरी फोटो, वाढदिवस असला तरी फोटो. अरे थांबणार आहात की नाही कधी. एखाद्याचा फोटो नसेल तर मी समजू शकतो की फोटो काढला. दरवर्षी दरवेळेला फोटो काढायचे. हा आजार आहे. कुठेतरी या गोष्टी थांबल्या पाहिजेत.