क्राईम

मजुरी करायला पुण्यात आले, तिसऱ्याची ओळख झाली

काल रात्री मुंबईत माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर ही हत्या कुणी आणि का केली याबद्दल अनेक तर्क-वितर्क लावले जात असतानाच आता यामध्ये मोठी अपडेट समोर आली आहे. या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने स्वीकारली आहे.
तीन आरोपींनी भर रस्त्यावर सिद्दिकी यांना गोळ्या घातल्या असून यातील दोन आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. अद्याप तिसरा आरोपी फरार आहे. दरम्यान, याच तिसऱ्या फरार आरोपीचे नाव आता समोर आले असून हा आरोपी गेल्या पाच ते सहा वर्षांपासून पुण्यात वास्तव्यास असल्याची माहिती समोर येत आहे.

शिवा असे त्या आरोपीचे नाव आहे. या माहितीनुसार शिवा हा पुण्यात पाच ते सहा वर्षांपासून एका स्कॅप डिलरकडे काम करतो आहे. त्याने धर्मराज नावाच्या 19 वर्षीय आरोपीला काही महिन्यांपूर्वी पुण्यात बोलावून घेतले होते.
त्यानंतर हत्येची सुपारी देणाऱ्या व्यक्तीने शिवा आणि धर्मराज यांची गुरुमेल याच्याशी भेट घडवून आणली होती. गुरुमेल हा 23 वर्षांचा आहे. सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे. याआधी त्याच्याविरोधात एक हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. धर्मराज आणि शिवा यांच्या नावावर याआधी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.
पोलीस आता या प्रकरणाशी संबंधित असणाऱ्या आरोपींचा शोध घेत असून पुण्यातील शिवा नावाचा तिसरा आरोपी सध्या फरार आहे. त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची पथके पुणे तसेच परराज्यात रवाना झाली आहेत.

Related Articles

Back to top button