ब्रेकिंग! होय, आम्हीच बाबा सिद्दीकींना मारले, बिश्नोई गँगने जबाबदारी स्वीकारली
काल रात्री मुंबईत माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर ही हत्या कुणी आणि का केली याबद्दल अनेक तर्क-वितर्क लावले जात असतानाच आता यामध्ये मोठी अपडेट समोर आली आहे. या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने स्वीकारली आहे. याबद्दल त्यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे.
सध्या ही फेसबुक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, सिद्दीकींचे बॉलिवूड अभिनेता सलमान खान, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि अनुज थापन यांच्याशी असलेल्या संबंधांमुळे ही हत्या केली आहे. सलमान खान, आम्हाला हे युद्ध नको होते. पण तुझ्यामुळे आमच्या भावाला जीव गमवावा लागला. आज बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूचे कारण म्हणजे त्यांचे बॉलीवूड, राजकारण आणि मालमत्ता व्यवहारातील दाऊद आणि अनुज थापन यांच्याशी असलेले संबंध आहेत. ओम जय श्री राम, जय भारत.