क्राईम

बॉलिवूड स्टारशी मैत्री, माजी मंत्री ते दिलखुलास माणूस

राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारात काल रात्री मृत्यू झाला. अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या केली.

सिद्दीकी हे केवळ राजकारणीच नव्हे तर बॉलिवूडमध्येही त्यांचे नाव प्रसिद्ध होते. दरवर्षी त्यांची इफ्तार पार्टी ही चर्चेत असते. या पार्टीसाठी फक्त बॉलिवूड सेलिब्रिटीच नव्हे तर छोट्या पडद्यावरील अनेक स्टार्सही शामिल होतात. शाहरूख खान, सलमान खान हेही आवर्जून सिद्दीकी यांच्या पार्टीत शामिल होतात.

काँग्रेसच्या एका जुन्या नेत्यांपैकी एक असलेले सिद्दीकी बॉलिवूडमध्येही लोकप्रिय होते. कॉलेजमध्ये असल्यापासूनच ते काँग्रेसशी जोडले गेले. त्यानंतर त्यांनी अनेक आंदोलनांतही सहभग घेतला होता. त्यांनी मुंबईतील एमएमके कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले. काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर बाबांनी दोनदा नगरसेवक म्हणून काम पाहिले. यानंतर ते तीनवेळा काँग्रेस पक्षाकडून महाराष्ट्र विधानसभेत आमदारही झाले.

सिद्दीकी आणि सलमान खान यांचे खूप जवळचे नाते आहे. ते दोघेही अनेकदा एकत्र दिसत. अनेक समाजसेवेच्या कामातही सलमान बाबांसोबत दिसत. एक दिलखुलास माणूस म्हणून सिद्दीकी यांची ओळख होती.

Related Articles

Back to top button