महाराष्ट्र
ब्रेकिंग! गृहमंत्री फडणवीसांचा राजीनामा नको, आता त्यांना…
राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारात काल रात्री मृत्यू झाला. अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या केली. सिद्दीकींच्या हत्येनंतर राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्ताधारी महायुतीवर ताशेरे ओढण्यास सुरूवात केली आहे. विशेष म्हणजे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली जात आहे. अशात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनीही गृहमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. फडणवीस यांची गृहमंत्री पदावरून हकालपट्टी करा, अशा मागणी राऊत यांनी केली आहे.
मुंबईत ज्याप्रकरे हत्यांचे सत्र सुरू आहे, त्या हत्या आता राजकीय नेते, माजी मंत्री आणि आमदारांपर्यंत पोहोचल्या आहेत. या राज्यात कोण सुरक्षित आहेत, हे एकदा राज्याच्या अपयशी गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले पाहिजे. सर्वसामान्यांपासून महिला, व्यापारी, उद्योगपती सुरक्षित नाहीत. शिवाय राजकीय नेते, माजी मंत्री, आमदार, कार्यकर्ते, पदाधिकारी सुरक्षित नाहीत, असेही राऊत म्हणाले.
हरियाणात निवडणूक जिंकले, म्हणून या राज्याचे गृहमंत्री इथे पेढे वाटतात. पेढे खा तुम्ही, पण राज्यात दिवसाढवळ्या जनतेसमोर रक्तपात, हिंसाचार, दहशत सुरू आहे. खंडणी सत्र सुरू आहे. अशावेळी राज्याच्या गृहमंत्र्यांची काही जबाबदारी आहे की नाही. तुरुंगाामध्ये मारामाऱ्या सुरू आहेत. दंगली सुरू आहेत. या महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात अपयशी असे हे गृहमंत्री आहेत. आतापर्यंत आम्ही या गृहमंत्र्यांचा राजीनामा मागत होतो, पण आता गृहमंत्र्यांची हकालपट्टी करा, असे सांगण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत राऊतांनी फडणवीसांवर टीका केली.