क्राईम

ब्रेकिंग! वनराज आंदेकर हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट

  • पुण्यात माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आली. वनराज यांच्यावर गोळीबार आणि कोयत्याने वार करण्यात आला होता. यामुळे त्यांचा मृत्यू झाला. सख्ख्या बहिणींनी भावाला मारण्याची सुपारी दिल्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. 
  • पोलिसांनी बहिणींना आणि मेहुण्याला अटक केली. त्यानंतर त्यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान पुणे पोलिसांनी या प्रकरणात ताम्हिणी घाटातून १३ जणांना अटक केली आहे.
  • वनराज यांची गोळीबार करून हत्या केलेल्या आरोपींनी ताम्हिणी घाटात तळ ठोकला होता. मात्र पुणे पोलिसांनी अगदी शिताफीने ताम्हिणी घाटात आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
  • पुण्यातील नाना पेठेत १४ ते १५ हल्लेखोरानी दुचाकीवरून येत वनराज यांच्यावर हल्ला केला आहे. 
  • वनराज यांच्या गोळीबार सुरू केला. काहीजण कोयता घेऊन त्यांच्या अंगांवर धावून गेले. आंदेकर यांना एकही गोळी लागली नाही. मात्र धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार करण्यात आले. त्यात वनराज यांचा मृत्यू झाला.

Related Articles

Back to top button