राजकीय

ब्रेकिंग! राष्ट्रवादीच्या गोटातून मोठी बातमी

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यातच आज पवारांनी आपले सासवडमधील सर्व कार्यक्रम अचानक रद्द केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार हे अचानक दिल्लीला पोहोचल्याने चर्चा अधिकच रंगू लागल्या आहेत. आता राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची मुंबईत जमवाजमव सुरु असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीचे काही आमदार मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचे समजते.
भाजपने शिवसेना जशी फोडली, तसाच प्रकार राष्ट्रवादीसोबत सुरु आहे. पक्ष सोडण्यासाठी आमदारांवर दबाव आणला जात असल्याचे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काल केले होते. त्यामुळे पवारांच्या भाजपसोबत जाण्याच्या चर्चेला अधिक बळ मिळाले आहे.

Related Articles

Back to top button