राजकीय

ब्रेकिंग! काँग्रेसचा मोठा धमाका

राज्यात राजकीय घडामोडी वाढत आहेत. दरम्यान अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीमती सुलभा खोडके यांच्यावर काँग्रेसने मोठी कारवाई केली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत पक्षातून सहा वर्षांसाठी त्यांना निलंबित करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या निर्देशावरून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही कारवाई केली आहे. 

सुलभा खोडके उद्या अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. 

उपमुख्यमंत्री अजितदादा हे रविवारी अमरावती दौऱ्यावर असून त्यांच्या उपस्थितीत उद्याच खोडके यांचा प्रवेश होणार असल्याची माहिती समोर आली आहे, त्याआधीच काँग्रेसने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. 

दरम्यान खोडके अमरावतीमधून अजितदादा गटातून विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील काही काळापासून खोडके अजितदादा गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. चार महिन्यापूर्वी झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांमध्ये खोडके यांचाही समावेश असल्याचा दावा केला जात होता. त्यातच नुकतीच त्यांनी अमरावतीमध्ये जोरदार बॅनरबाजीही केली होती. त्यानंतर आता खोडके यांच्यावर पक्षाने कारवाई केली आहे.

Related Articles

Back to top button