मी फक्त एकाच गोष्टीला घाबरते
मैं गोपीनाथ मुंडे की बेटी हूँ, अशी शायरी करत भाजप आमदार पंकजा मुंडे यांनी आज बीडमधील दसरा मेळाव्याची सुरुवात केली. मी गरीबांसाठी काम करणारी आहे. राजकारणाला चिटकून बसणारी नाही.
पाच लेकरांनी जीव दिला. त्या आमदारकीचे काय गोड वाटणार आहे, असे विधान मुंडे यांनी केले. त्यासोबतच त्यांनी मला फक्त एकाच गोष्टीची भीती वाटते, असे म्हणत एक मोठा खुलासा देखील केला.
पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की, कितीही वर्ष लागो तुमचे जीवन सुसह्य केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. तुमच्या मुलांच्या अंगावरचा मळका शर्ट पाहून मला वेदना होतात. पंकजा मुंडे कुणाला घाबरत नाही. अंधारात भेटत नाही. महाराष्ट्राच्या प्रत्येक गावा-गावात जावून मी दौरा करणार आहे. पंकजा मुंडे खोटे बोलते का? उजेडात एक आणि अंधारात एक असे वागते का? आणि कुणाला घाबरते का? कुणालाही घाबरत नाही. फक्त घाबरते जर या पुढच्या मैदानात माझे भाषण ऐकण्यासाठी लोक नसतील तेव्हा. मी भगवान बाबांना प्रार्थना करेन की असा दिवस येऊ देऊ नका.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, यावेळी गडबड झाली. आपल्याला ही गडबड दुरुस्त करायची आहे. छत्रपती घराण्याने गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम केले. एकदा उदयनराजेंच्या प्रचाराला गेल्यानंतर त्यांनी मला त्यांच्या देवघरात नेऊन माझ्या हाताने आरती केली होती. त्यांच्या एका घरात त्यांच्या वडिलांचा आणि गोपीनाथ मुंडे यांचा फोटो आहे. आम्ही जात बघून काम करत नाही. आपल्याला काम करणाऱ्या माणसाच्या मागे उभे राहायचे आहे. जातीवर स्वार होणाऱ्यांच्या मागे उभे राहायचे आहे.