राजकीय
ब्रेकिंग! काँग्रेसचे ‘मिशन महाराष्ट्र’, स्टार प्रचारकांची यादी जाहीर

- सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. आज काँग्रेसची स्टार प्रचारक यादी जाहीर करण्यात आली आहे. राहुल गांधी सोनिया गांधी यांच्यासह इतर नेते प्रचारासाठी महाराष्ट्रात येणार आहेत.
- 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला महाराष्ट्रात चांगले यश मिळाले. या यशानंतरच काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रासुद्धा विजयासाठी कारणीभूत ठरली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचा प्रयत्न काँग्रेसचा असणार आहे.
- काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी- मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, सोनिया गांधी, अलका लांबा, के.जे. जॉर्ज, के. जयकुमार, प्रियांका गांधी, जिग्नेश मेवाणी, के.सी. वेणुगोपाल, सलमान खुर्शीद, अशोक गेहलोत, राजीव शुक्ला, मुकुल वासनिक, नाना पटोले, अविनाश पांडे, बाळासाहेब थोरात, सिद्धरामय्या, विजय वडेट्टीवार, भूपेश बघेल, पृथ्वीराज चव्हाण, रेवंथ रेड्डी, श्री चंद्रकांत हांडोरे, चरणजित सिंग चन्नी, वर्षा गायकवाड, डी.के. शिवकुमार, आरिफ नसीम खान, सचिन पायलट, प्रणिती शिंदे, रणदीप सुरजेवाला, सतेज उर्फ बंटी पाटील, डॉ.जी.परमेश्वरा, विलास मुत्तेमवार, एम.बी. पाटील, भाई जगताप, कन्हैया कुमार, अमित देशमुख, इम्रान प्रतापगढी.