राजकीय

हरियाणात ‘मोदी मॅजिक’

हरियाणातील विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीच्या कलांनुसार भाजप 50 जागांवर तर काँग्रेस 35 जागांवर आघाडीवर आहे. मुख्यमंत्री नायब सिंग सैनी आणि काँग्रेस नेते भूपेंद्र सिंग हुडा आपापल्या जागेवर आघाडीवर आहेत. अशातच हरियाणातून महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पंतप्रधान मोदी हे भाजपसाठी पुन्हा एकदा ट्रम्प कार्ड असल्याचे सिद्ध झाले आहे. त्याचवेळी काँग्रेस नेते राहुल गांधी काँग्रेससाठी काही विशेष चमत्कार करू शकले नाहीत, असेही दिसून येत आहे.
हरियाणात निवडणूक प्रचारादरम्यान मोदींनी एकूण पाच सभा घेतल्या. या रॅलींचा परिणाम हरियाणातील 17 विधानसभा जागांवर झाला. यापैकी भाजप दहा जागांवर आघाडीवर आहे. त्याशिवाय काँग्रेस पाच जागांवर पुढे आहे. त्याचवेळी राहुल गांधींबद्दल बोलायचे झाले तर, त्यांनी हरियाणात ज्या १४ जागांवर रॅली काढली होती, त्यापैकी काँग्रेस 7 जागांवर पिछाडीवर आहे. काँग्रेस फक्त चार जागांवर पुढे आहे. तर तीन जागांवर अपक्ष उमेदवार पुढे आहेत.

Related Articles

Back to top button