ब्रेकिंग! राज्यात फोडाफोडीच्या राजकारणाला वेग

राज्यात फोडाफोडीच्या राजकारणाने वेग घेतला आहे. या राजकारणाचा फटका आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना बसला आहे. शिंदेंच्या युवासेनेचे सचिव दीपेश म्हात्रे धनुष्यबाणाची साथ सोडणार असून ठाकरेंची मशाल हाती घेणार आहेत. म्हात्रे आजच उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन हाती बांधणार आहेत. ऐन निवडणुकीच्या आधी ही घटना घडल्याने शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. या राजकारणाचे प्रत्युत्तर आता शिंदे कसे देतात याची उत्सुकता आहे.
दरम्यान शिवसेनेत फूट पडली, त्यावेळी म्हात्रे यांनी शिंदे यांना साथ दिली होती. शिंदे यांनी त्यांना युवासेनेचे सचिवपद दिले होते. म्हात्रे येथे प्रभावीपणे काम करत होते. परंतु, आता निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पुन्हा ठाकरे गटात परतण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्याबरोबर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील चार माजी नगरसेवक आणि काही पदाधिकारी ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.