राजकीय

ही मस्ती घरी दाखवायची; तुमच्या दोन्ही हातांवर खून

तुम्ही खुनी आहात.रक्त बदलण्याचे पाप तुम्ही केले, असा थेट आरोप करत पुण्यातील पोर्शे कार अपघातावरून खासदार सुप्रिया सुळेंनी अजितदादा पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर थेट टीका केली आहे.

तुमच्या दोन्ही हातावर खून आहे. पोर्शे कार आहे, म्हणून तुम्ही त्यांची बाजू घेताय? असा प्रश्न उपस्थित करत जे दोन जीव गेले त्यांच्या आईचे अश्रू कोण पुसणार? असेही सुळे म्हणाल्या.
महाराष्ट्र तुमच्याकडे उत्तर मागत आहे. घटना घडल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये कुणी फोन केला? त्यांना बिर्याणी कोण घेऊन गेले? ते पोलीस ठाणे आहे. तुमच्या घरचा डायनिंग टेबल नाही. त्या दोन जिवांच्या आईला न्याय मिळवून देण्यासाठी मी यांच्या विरोधात प्रचार करणार आहे. अशी लोक वगडाव शेरीला लोकप्रतिनिधी हवे आहेत का ? असेही सुप्रिया म्हणाल्या.

Related Articles

Back to top button