क्राईम

खळबळजनक! माथेफिरू प्रियकराने प्रेयसीचा केला खून

  1. आपल्या प्रेयसीने ब्रेकअप केल्याच्या भयंकर रागातून एका प्रियकराने प्रेयसीच्या फ्लॅटवर जाऊन शस्त्राने तिच्या गळ्यावर सुमारे ३५ वार करत तिचा खून केला. यानंतर आरोपीने तिचा मृतदेह आंबोली घाटात नेऊन टाकला. या हत्याकांडांमुळे पणजीसह सिंधुदुर्ग जिल्हा हादरला आहे.
    कामाक्षी उडापनोव (वय ३०) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर फकीर ऊर्फ प्रकाश चुंचवाड, असे आरोपी प्रियकराचे नाव असून त्याला अटक झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना गोवा राज्यात घडली. 
मृत कामाक्षी उत्तर गोव्यातील परवरी भागातील राहत होती. गेल्या काही दिवसांपासून कामाक्षी बेपत्ता होती. याप्रकरणी परवारी पोलिस ठाण्यात तिच्या घरच्यांनी तक्रार दिली होती. तिचा शोध घेत असताना ३१ ऑगस्टला या हत्याकांडाचा खुलासा झाला. पोलिसांनी आरोपी फकीरला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. सुरुवातीला तो काहीच बोलला नव्हता. पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देत होता. परंतु, त्याला पोलिसांनी हिसका दाखवताच त्याने संपूर्ण खुनाचा घटनाक्रमच सांगितला.
आरोपी फकीर आणि कामाक्षी यांचे प्रेमसंबंध होते. मात्र, कामाक्षीने फकीरसोबत ब्रेकअप केला होता. याचा प्रचंड राग फकीरला आला. त्याने तिला ठार मारण्याचे ठरवले. दरम्यान, फकीर हा तिला शेवटच्या भेटण्याच्या उद्देशाने तिच्या फ्लॅटवर गेला. यावेळी फकीरने सोबत नेलेल्या चाकूने कामाक्षीच्या गळ्यावर सुमारे ३५ वार केले. 
यात कामाक्षीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर तिचा मृतदेह आंबोली घाटात नेऊन त्याने जमिनीत पुरला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला आहे. पोलिसांनी आरोपी फकीरला अटक केली आहे.

Related Articles

Back to top button