क्राईम

आरारारा खतरनाक! तीन दरोडेखोरांशी एकटीच भिडली महिला

सोशल मीडियावर सध्या एका महिलेच्या धाडसाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक महिला न घाबरता विलक्षण धाडस आणि साहस दाखवत एकटीच तीन दरोडेखोरांशी लढतांना दिसतआहे. पंजाबमधील या महिलेच्या धाडसामुळे दरोड्याचा प्रयत्न हाणून पडला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून सोशल मिडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अनेक नेटकरी या महिलेचे कौतुक करत आहेत. व्हिडिओत घरात घुसलेल्या तीन दरोडेखोरांशी एकटी महिला लढतांना दिसत आहे. तसेच त्यांना तिने पळवूनदेखील लावले.
एका पत्रकाराने एक्सवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करतांना त्याने या घटनेची माहिती दिली आहे. हा व्हिडिओ अमृतसरमधील असून दरोडेखोरांनी एका घरात दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु घरात असलेल्या धाडसी महिलेसमोर दरोडेखोर काहीही करू शकले नाहीत. या धाडसी महिलेने एकट्याने तिन्ही दरोडेखोरांवर मात केली.

सीसीटीव्ही फुटेजनुसार तिने तिन्ही दरोडेखोरांना पकडले. एक इंचही मागे न हटता प्रतिकार करत हुशारीने सोफ्यावरून महिलेने दरवाजा बंद केला. दरम्यान यावेळी ती मदतीसाठी आरडाओरडा करत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

एका युजरने लिहिले की, आपल्या घराचे रक्षण केल्याबद्दल आणि धैर्याला सीमा नसते हे दाखवून दिल्याबद्दल ही महिला सन्मानास पात्र आहे. एकाने लिहिले की, हे खूप धाडसी आहे कारण घरात दोन लहान मुलेदेखील आहेत. त्यामुळे महिलेला स्वत:चे रक्षण करण्यासाठी आणखी शक्ती मिळाली. 

Related Articles

Back to top button