राजकीय

ब्रेकिंग! महाविकास आघाडीत फटाके फुटू लागले

काँग्रेस पक्षाची मोडलेली पाठ अजून सरळ व्हायला तयार नाही, तर ठाकरे गट अजूनही झोपेतून जागा व्हायला तयार नाही, असे वक्तव्य खासदार अमोल कोल्हे यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बैठकीत त्यांनी हे वक्तव्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यातील परिस्थितीबाबत बोलताना कोल्हे यांनी, त्यांच्याच सहयोगी पक्षांबाबत हे भाष्य केल्याचे समजते. त्यांच्या या विधानामुळे राज्यात आता नवा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता असून कोल्हेंच्या विधानामुळे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचाही संताप झाल्याचे दिसून आले. कोल्हेंनी आपल्या पक्षाकडे बघावे, त्याबद्दल बोलावे, असा सल्ला वडेट्टीवारांनी दिला आहे.

Related Articles

Back to top button