महाराष्ट्र
ब्रेकिंग! आणखी 16 लाख लाडक्या बहिणींना सरकारचे गिफ्ट

सोलापूरसह संपूर्ण राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, या योजनेत पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात तीन हजार रूपये जमा होण्यास सुरूवात झाली आहे. बुधवारपासून हे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात हस्तांतरणास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत तब्बल 96 लाख 35 हजार महिलांच्या खात्यात तीन हजार रूपये जमा झाले आहेत. येत्या 19 ऑगस्टपर्यंत हे पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे आजपासून सलग चार दिवस तुमच्या खात्यात पैसे होणार आहेत. त्यामुळे ज्या महिलांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झाले नाहीत, त्या महिलांच्या खात्यात पुढील चार दिवस पैसे हस्तांतरण होण्याची शक्यता आहे.
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या योजनेत किती लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत, याचा आकडा सांगितला आहे. आज सकाळपासून 16 लाख 35 हजार भगिनींच्या खात्यात तीन हजार रुपये लाभ जमा झाला आहे, अशी माहिती तटकरे यांनी दिली. तसेच याआधी 80 लाख महिलांच्या खात्यात थेट लाभ हस्तांतरण पूर्ण झाला आहे. अशाप्रकारे एकूण 96 लाख 35 हजार महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ यशस्वीरित्या हस्तांतरित झाला आहे. तर उर्वरित महिलांनाही लवकरच लाभ मिळावा, यासाठी महिला व बालकल्याण विभाग युद्धपातळीवर कार्यरत असल्याचा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला आहे.