महाराष्ट्र

ब्रेकिंग! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या घोषणेला उशीर का?

आज केंद्रीय निवडणूक आयोगाने जम्मू-काश्मीर व हरयाणा विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. मात्र, महाराष्ट्र व झारखंड विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा केली नाही. त्याचे कारण मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिले आहे.
महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ हरयाणा विधानसभेबरोबरच नोव्हेंबरमध्ये संपत आहे. त्यामुळे निवडणूक आयोग महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आज घोषित होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, तसे झाले नाही. याबाबत प्रश्न विचारला असता राजीव कुमार यांनी यासाठी काही कारणे दिली.
मागील वेळेस महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुका एकत्र झाल्या हे खरे आहे. मात्र, त्यावेळी जम्मू-काश्मीर हा घटक नव्हता. यावेळी एका वर्षी चार निवडणुका आहेत आणि त्यानंतर लगेच पाचवी निवडणूक आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही फक्त दोन निवडणुका एकत्र घेण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून जम्मू-काश्मीरवर आम्हाला विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. तिथं सुरक्षेची व मनुष्यबळाची जास्त गरज लागणार आहे. त्यामुळे सध्या फक्त जम्मू-काश्मीर आणि हरियाणाची निवडणूक होईल. त्यानंतर महाराष्ट्र, झारखंड आणि दिल्लीची निवडणूक होईल, असे राजीव कुमार म्हणाले.
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक टाळण्याचे कारण देताना त्यांनी सण-उत्सवांकडे बोट दाखवले. महाराष्ट्रात अलीकडे मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे तिथं निवडणूक प्रक्रियेत अडथळा येऊ शकतो. शिवाय, राज्यात अनेक सणही आहेत. त्यात गणेशोत्सव आहे. त्यानंतर नवरात्रोत्सव, दिवाळी आहे. त्यामुळे  देखील या निवडणुकीची घोषणा आम्ही टाळली आहे, असे राजीव कुमार म्हणाले.

Related Articles

Back to top button
जॉईन व्हाट्सअप ग्रुप