राजकीय

काँग्रेसने महिलांसाठी घोषणा केली मोठी

महायुती सरकारने महिला सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेला महाविकास आघाडीचा घटक असणाऱ्या काँग्रेसचा विरोध आहे. पण अगदी लाडक्या बहिणीसारखीच एक योजना काँग्रेस कर्नाटकमध्ये राबवत आहे, जिचे नाव आहे गृहलक्ष्मी योजना. अगदी कर्नाटक सरकारच्या योजनेप्रमाणेच लाडकी बहीण योजना देखील आहे. पण समसमान योजनेसाठी काँग्रेसने वेगवेगळी भूमिका घेतली आणि आता त्यात मोठा गाजावाजा करत घोषणा केलेली गृहलक्ष्मी योजनाही वादात सापडली.
काँग्रेसने कर्नाटकातील आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात ज्या पाच हमी दिल्या होत्या, त्यातील एक महत्त्वाची हमी होती ती गृहलक्ष्मी योजनेची. राज्यातील महिलांना दरमहा दोन हजार रुपये देण्याची मदत करणारी ही योजना काँग्रेस सरकार निवडून आल्यावर सुरूही करण्यात आली. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांसारख्या बड्या नेत्यांच्या हातून या योजनेचा शुभारंभ झाला, पण तब्बल तीन महिने उलटून गेले तरी कर्नाटकातील महिला लाभार्थ्यांना लक्ष्मी काही बघायला भेटलेली नाही. 

मागच्या वर्षी 15 ऑगस्टला सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा काही अपवाद वगळता मेपर्यंत कार्यक्रम ठीकठाक सुरू होता. मात्र मागील तीन महिन्यांपासून हे पैसे न आल्याने योजना बंद झाली की काय? असा प्रश्न आता कर्नाटकातील महिला विचारू लागल्या आहेत. पण किमान सरकार दरबारी तरी योजना बंद झाल्याची, थकबाकी असल्याची कोणतीही नोंद नाही.

Related Articles

Back to top button