क्राईम

रूममध्ये सुरू होते भलतेच चाळे ; दिग्दर्शकाने जबरदस्ती बोलावले अन्…

अभिनेत्री मीनू मुनीर हिने चित्रपट निर्माते-अभिनेते बालचंद्र मेनन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मीनू म्हणाली की, २००७ मध्ये बालचंद्रने तिला इतरांसोबत सुरू असलेली लैंगिक कृत्ये पाहण्यास भाग पाडले. याआधी मीनूने आणखी ७ जणांवर शारीरिक आणि शाब्दिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. या यादीत प्रसिद्ध अभिनेते जयसूत्रच्या नावाचाही समावेश आहे. तिची तक्रार लक्षात घेऊन एफआयआर नोंदवण्यात आला आहे. एका मुलाखतीत मीनूने हेमा समितीच्या अहवालाचा परिणाम आणि स्वतःचा अनुभव याबद्दल मोकळेपणाने भाष्य केले आहे.
मल्याळम अभिनेत्री मीनूने सांगितले की, मेननने २००७ मध्ये तिच्या खोलीत जबरदस्तीने सामूहिक सेक्स दाखवला होता. ती म्हणाली की,  त्या रूममध्ये तिथे आणखी काही लोक बसले होते, जे हे सर्व पाहत होते. तिथे तीन मुली होत्या आणि ते स्वतः त्यात सामील होते. मी कशीबशी त्या खोलीतून बाहेर पडले. मात्र, त्यांनी मला तिथे बसून हे सर्व बघायला सांगितले होते.
मीनूने म्हटले की, हेमा समितीचा हा अहवाल प्रकाशित झाल्यावर तिला हेच वाटले की, तक्रारींवर आता गुन्हा दाखल केला गेला पाहिजे. आपल्या प्रवासाचे वर्णन करताना मीनूने इंडस्ट्रीपासून आपला भ्रमनिरास कसा झाला हे सांगितले. मीनू म्हणाली की, माझी अनेक स्वप्ने होती, पण ही इंडस्ट्री माझ्यासाठी दुःस्वप्न ठरली. हा हेमा समितीचा अहवाल केवळ इंडस्ट्री नव्हे, तर आपला समाजही शुद्ध करत आहे.

Related Articles

Back to top button