राजकीय

ब्रेकिंग! अजितदादांना पुन्हा धक्का बसणार?

लोकसभेनंतर आता विधानसभेच्या तोंडावर अजितदादा पवार गटाला एकामागून एक मोठे धक्के बसत आहेत. अजितदादा गटाचे माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी पवारांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत.
भोसरीचे माजी आमदार विलास लांडे हेसुद्धा पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत. आमदार बबनदादा शिंदे आणि लांडे हे दोन्ही नेते अजितदादा गटात आहेत. मात्र, शरद पवारांच्या भेटीला आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. कालच राजन पाटील यांनीदेखील पवार यांची भेट घेतली होती.
यासोबतच आष्टी पाटोदा येथील शरद पवार गटाचे विधानसभा प्रमुख राम खाडे हे अजितदादा गटाचे आमदार बाळासाहेब आजबे यांच्याविरोधात रिंगणात उतरणार असल्याने तेदेखील पवारांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Related Articles

Back to top button