पवार अस्वस्थ झाले असते, तर ८४ वर्ष जगले नसते

देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. तसेच विविध राजकीय पक्षांकडून प्रचार सभा व जाहीर सभा घेण्यात येत आहेत. देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार असून आतापर्यंत दोन टप्प्याचे मतदान पूर्ण झाले आहे. आता मतदानाचा तिसरा टप्पा सात मे रोजी आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या ‘भटकती आत्मा’वरून महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहे. मोदींना उत्तर देताना पवारांनी सांगितले की, हो, मी शेतकरी आणि कामगारांसाठी अस्वस्थ आहे. आता पवारांच्या याच विधानावर बोट ठेवत नारायण राणे यांनी एक विधान केले आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेल्या राणे यांनी पवारांना लक्ष्य केले. ‘इस महाराष्ट्र में अस्वस्थ नेताजन है, खाली भटक रहा है उनका आत्मा’, हे मोदीजींचे वाक्य; काही जणांना लागले. मोदीजींनी तर नाव घेतले नाही. एक व्यक्ती असे म्हणाले की, महागाईसाठी लोक त्रस्त आहेत. महागाई आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मी अस्वस्थ आहे. पवार साहेब कधीपासून हो?
पवार अस्वस्थ झाले असते एखाद्या विषयासाठी, ८४ वर्ष जगले नसते. माणसाला हवामानामुळे अस्वस्थ झाला काय, ५०-५५ वर्षात अटॅक येतो. माणसं जातात. ८४ वर्षात जग इकडच्या तिकडं होवो… वादळ, पूर येवो, काय नाही. पवारांना काही होत नाही. बिनधास्त असतात. मोदी साहेबांना उकसवतात, असे राणे म्हणाले.