क्राईम

प्रेयसीसोबत वाद, नंतर…

विवाहितेसोबत प्रेम संबंध असताना प्रियकर व महिलेचे वारंवार वाद व्हायचे. यातून प्रियकराने विवाहित महिलेची हत्या केल्याची घटना भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे रात्रीच्या सुमारास घडली. भुसावळ तालुका पोलिस स्थानकात हत्त्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.
भुसावळ तालुक्यातील साकेगावमधील भिलाटी परिसरात वास्तव्यास असलेली सोनाली कोळी (वय २६) असे घटनेत मृत महिलेचे नाव आहे. सोनाली ही पती व मुलीसोबत राहत होती. दरम्यान तिचे गावातीलच संशयित सागर रमेश कोळी (वय २८) याच्यासोबत प्रेम संबंध होते. मात्र मागील काही दिवसांपासून सोनाली व सागर यांच्यात वारंवार भांडण व्हायचे. यातूनच सागर हा २५ सप्टेंबरला रात्री साडे अकराच्या सुमारास सोनालीसोबत वाद घालत तिला शिवीगाळ करून मारहाण करत होता. यावेळी परिसरातील विनोद कुंभार हे त्यांच्यातील भांडण सोडविण्यासाठी गेले होते.

दरम्यान दोघांमध्ये वाद सुरु असताना भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या विनोद यांनादेखील सागरने मारहाण केली. याचवेळी सागरने सोनालीच्या हिच्या पाठीवर व पोटावर चाकूने वार केले. यात गंभीर झालेल्या सोनालीला भुसावळ ग्रामीण रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. याबाबत विनोद यांच्या दिलेल्या फिर्यादीवरून पोलिस ठाण्यात सागर विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Related Articles

Back to top button