क्राईम

भयंकर! इयत्ता दुसरीतील मुलाचा खून

एका शाळेत माणुसकीला काळीमा फासणारी घटा घडली आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस येथील एका शाळेत समृद्धी आणि मोठ्या प्रसिद्धीसाठी काळ्या जादूचा प्रयोग केला आहे. यामध्ये विधीचा भाग म्हणून इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्याचा बळी देण्यात आला. 22 सप्टेंबर रोजी वसतिगृहाच्या खोलीत तीन जणांनी मुलाचा गळा आवळून खून केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेचा मालक, त्याचे वडील अशा सगळ्यांचा यामध्ये समावेश होता.
इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा नरबळी द्यायचा होता. मात्र, त्याच दरम्यान त्याचा गळा दाबून खून करण्यात आला आहे. हत्येचे हे प्रकरण तंत्र-मंत्राशी संबंधित आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हाथरसचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक कुमार म्हणाले, हाथरसच्या साहपाऊ पोलीस स्टेशनने मुलाच्या हत्येचे गूढ उकलले आहे. याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
शाळेच्या बाहेरील ट्यूबवेलमध्ये दुसरीच्या वर्गातील विद्यार्थ्याची हत्या करण्याचा कट रचण्यात आला होता. मात्र, शाळेच्या खोलीतून बाहेर पडताना मुलाला जाग आली. त्यामुळे भीतीपोटी तिन्ही आरोपींनी मुलाचा गळा आवळून खून केला. या शाळेच्या संचालकाचे वडील तंत्र-मंत्राचे काम करत असल्याचे सांगितले जात आहे.

यातील आरोपींनी पोलिसांना सांगितले की, 6 सप्टेंबर रोजी त्यांनी राज नावाच्या 9 वर्षाच्या मुलाचा बळी देण्याची योजना आखली होती, ती फसली. राजचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला, मात्र मुलगा मोठ्याने ओरडला. राजची वैद्यकीय तपासणी करण्यात आली, त्यात त्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले.

Related Articles

Back to top button