महाराष्ट्र

ब्रेकिंग! फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाची तोडफोड

एका अज्ञात महिलेने उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे मंत्रालयात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित महिला पास न काढता मंत्रालयात आली होती. महिलेने सचिवांसाठी असलेल्या गेटने मंत्रालयात प्रवेश केला. त्यानंतर फडणवीस यांच्या कार्यालयाची तोडफोड करत ही महिला तिथून निघून गेली. सदर घटनेचा व्हिडीओ समोर येताच खळबळ उडाली आहे. त्यामुळे पोलिसांनी आता संबंधित महिलेचा शोध सुरु केला आहे. पोलीस आयुक्तांनीदेखील या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.

दुसरीकडे संबंधित घटनेमुळे मंत्रालयाच्या सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी ठळकपणे समोर आल्या आहेत. काल रात्री ही महिला मंत्रालयात शिरली. त्यावेळी मंत्रालयाच्या परिसरात फारसा पोलीस बंदोबस्त नसल्याने संबंधित महिला कोणाच्याही लक्षात न येता सचिवांच्या गेटने सहजपणे आतमध्ये शिरली. यानंतर ही महिला फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर गेली आणि त्याठिकाणी तोडफोड केली.

Related Articles

Back to top button