महाराष्ट्र
अक्षय शिंदे एन्काउंटरबाबत रोखठोक भाष्य

बदलापूर लैंगिक अत्याचार घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांकडील पिस्तुल हिसकावून तीन गोळ्या झाडल्या. यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला होता. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय याचा मृत्यू झाला होता.
या एन्काऊंटरबाबत विरोधक आणि न्यायालयाकडून अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोखठोक मत मांडले आहे. एखाद्याने हल्ला केला तर पोलीस टाळ्या वाजवत बसणार नाहीत, असे फडणवीस म्हणाले.
फडणवीस यांना बदलापूर एन्काउंटर प्रकरणात उपस्थित करण्यात आलेल्या आरोपांविषयी प्रश्न विचारण्यात आले. त्यावर फडणवीस यांनी ‘एखाद्या गुन्हेगाराचा एन्काउंटर व्हावा, या मताचे आम्हीदेखील नाही. मला व्यक्तिश: कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणात कायद्याचे पालन व्हावे, असे वाटते. कायद्याच्या माध्यमातूनच गुन्हेगाराला शासन झाले पाहिजे. ही सगळी प्रक्रिया वेगाने पार पडली पाहिजे.

अक्षय याचा मृत्यू पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात झाला. एखाद्याने हल्ला केल्यावर आमचे पोलीस टाळ्या वाजवत बसणार नाहीत, असे फडणवीस यांनी सांगितले.
बदलापूर एन्काउंटरनंतर मुंबई, ठाणे आणि बदलापूर परिसरात अनेक ठिकाणी फडणवीस यांच्या अभिनंदनाचे बॅनर्स लागले होते. या बॅनर्सवर ‘बदला पुरा’, ‘देवाचा न्याय’, ‘देवाभाऊ सुपरफास्ट’ अशा उपाध्या देऊन फडणवीस यांचा गृहमंत्री म्हणून गौरव करण्यात आला होता. याविषयी फडणवीस यांना विचारले असता त्यांनी म्हटले की, हा प्रकार अयोग्य आहे. एन्काउंटरसारख्या घटनेचे उदात्तीकरण कधीच होता कामा नये.