महाराष्ट्र

लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आला का ‘हा’ मेसेज?

लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.
दरम्यान सप्टेंबर महिन्यात अर्ज दाखल केलेल्या महिलांचे अर्ज मंजूर होण्यास सुरुवात झाली आहे. ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत, अशा महिलांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर अर्ज स्वीकृतीचे मेसेजेस पाठवले जात आहेत. म्हणजेच या महिलांच्या बँक खात्यात आता लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार हे स्पष्ट झाले आहे. तर ज्या महिलांना अद्याप मेसेजेस आलेले नाहीत, अशा महिलांच्या अर्जांची अद्याप पडताळणी झाली नसावी किंवा त्यांचे अर्ज नामंजूर झाले असण्याची शक्यता आहे.
29 सप्टेंबर रोजी रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम होणार आहे.

यावेळी महिलांना या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे लाभार्थ्यांना 29 सप्टेंबरपासून डीबीटीद्वारे हस्तांतरित करण्यात येणार आहेत.
सप्टेंबर महिन्यात नव्याने किती महिलांनी आपले अर्ज दाखल केलेले आहेत आणि त्यापैकी किती अर्ज मंजूर झालेले आहेत, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Related Articles

Back to top button