राजकीय

ब्रेकिंग! राज्यात राजकीय भूकंप होणार?

  • राज्यातील आगामी राजकीय घडामोडींबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या विधानांनी चर्चांना उधाण आणले आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या विधानाने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उद्धव ठाकरेंना संपवून शिंदेंना आणले, आता एकनाथ शिंदेंनाही संपवून नवा ‘उदय’ पुढे येईल, असे म्हणत वडेट्टीवार यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. त्यांनी भाजपवर राज्यातील सत्ता एकहाती करण्याचा कट आखल्याचा आरोप करत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतून याची सुरुवात होईल, असे सांगितले. वडेट्टीवार यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
  • दरम्यान खासदार संजय राऊत यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत, महाकुंभ मेळ्यात जावे, असा खोचक टोला लगावला. राऊत यांनी पुढे स्पष्ट केले की, एकनाथ शिंदेंना बाजूला करून उदय सामंत यांच्यासोबत 20 आमदार तयार आहेत. हा डाव याआधीच आखला गेला होता. भाजपचे राजकारण फोडाफोडीतूनच चालते. शिंदे गट आणि अजित पवार गटही भाजपच्या राजकीय खेळाचा भाग बनले आहेत.

Related Articles

Back to top button