ब्रेकिंग! शकिब हसनला खूनप्रकरणी अटक होण्याची भीती?
टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यात कसोटी मालिका सुरू आहे. चेन्नईतील पहिला कसोटी सामना टीम इंडियाने 280 धावांनी जिंकला. आता दुसरा कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यापूर्वी बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनने एक मोठी घोषणा केली आहे.
शाकिबने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका ही त्याची मायदेशातील शेवटची मालिका असेल, असे त्याने म्हटले आहे. मीरपूर येथे तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळणार आहे. शाकिबनेही T20I मधून निवृत्ती जाहीर केली आहे.
टीम इंडियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी कानपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शाकिबने ही मोठी घोषणा केली. अलीकडेच बांगलादेशमध्ये शाकिबवर खुनाचा गुन्हा दाखल झाला होता, त्यानंतर त्याने आता हा निर्णय घेतला आहे. बांगलादेशात प्रवेश केल्यास तो पुन्हा देशाबाहेर पडू शकेल की नाही हे माहिती नाही.
बांगलादेशातील परिस्थितीबद्दल कुटुंबियांकडून आणि मित्रांकडून जे काही ऐकतोय त्यावरून मी थोडासा साशंक आहे. खुनाच्या आरोपांमुळे शाकिब बांगलादेशमध्ये खेळू शकला नाही, तर कानपुरमधील टीम इंडियाविरुद्धचा कसोटी सामना हा त्याचा शेवटचा सामना ठरेल.