दुसरे लग्न केले म्हणून पहिला नवरा संतापला
राज्यात अलीकडे गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. दरम्यान मालवणमध्ये नवऱ्याने भर बाजारात पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवले असून, या घटनेत महिलेचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत.
प्रीती केळुस्कर (वय ३५) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. सुशांत गोवेकर असे या प्रकरणातील आरोपी पतीचे नाव आहे. घटनेनंतर तो फरार झाला होता, मात्र पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
मालवण एसटी बसस्थानक परिसरात ही घटना घडली आहे. प्रीती या एका शॉपमध्ये काम करत असताना पतीने भर बाजारात येऊन त्यांच्यावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या होत्या, त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
त्यांचे धुरीवाडा येथील एका व्यक्ती सोबत लग्न झाले होते. मात्र त्याच्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून या महिलेने अलीकडे काही महिन्यांपूर्वी दुसरे लग्न केले. याचा राग तिच्या पहिल्या नवऱ्याच्या मनात होता. या रागातूनच तो ती काम करत असलेल्या लॅबमध्ये पोहोचला.
त्यावेळी त्याच्या हातात पेट्रोलने भरलेली बाटली होती. त्याने बाटलीतून आणलेले पेट्रोल तिच्या अंगावर ओतले. त्यानंतर हातातील लायटरने तिला आग लावली. तिने लगेच पेट घेतला. त्यानंतर तो पळून गेला. लॅबमध्ये काही समजण्या आत गोंधळ उजाला. काय करावे काय करून नये हे कोणालाच समजले नाही. शेवटी पेटलेल्या अवस्थेत ही महिला रस्त्यावर धावत गेली. त्यावेळी तिथे उभे असलेले लोकही घाबरून गेले. त्यांनी धावाधाव करून या महिलेच्या अंगावरील आग विझवली.
त्यात ती मोठ्या प्रमाणात भाजली होती. लगेचच तिला उपचारासाठी मालवण ग्रामीण रुग्णालयात आणले गेले. येथे तिच्यावर प्राथमिक उपचार करून तिला ओरोस जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले होते. उपचार सुरु असताना रात्री तिचे निधन झाले.