सोलापूर
तुम्हाला येथे खल्लास करतो…

सोलापूर (प्रतिनिधी) मागील भांडणाचा राग मनात धरून शिवीगाळ करत तुम्हाला येथे खल्लास करतो असे म्हणून दमदाटी करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची फिर्याद सुभद्रा जनार्दन बनसोडे (वय-२२,रा. मातंग वस्ती, शुक्रवार पेठ) यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात दिली आहे.
त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मच्छिंद्र बनसोडे, शहा मच्छिंद्र बनसोडे, योगेश बनसोडे, दादावर बनसोडे, अमोल बनसोडे, टिल्लेश अनिल बनसोडे, विनोद खंडू बनसोडे (सर्व.रा. मातंग वस्ती, समाचार चौक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना १६ जानेवारी रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास शुक्रवार पेठ समाचार चौक येथे घडली. या घटनेचा पुढील तपास पोसई.जाधव हे करीत आहेत.