क्राईम

ट्विस्ट! अक्षय शिंदेचा एन्काऊंटर ‘फेक’?

बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणावरून सध्या महाराष्ट्रातील वातावरण चांगलेच तापले आहे. सोमवारी तळोजा कारागृहातून बदलापूरला ट्रान्झिट रिमांडला नेण्यात येत असताना एन्काउंटर करण्यात आला. 
यावरून एकीकडे पोलिसांचे आणि राज्य सरकारचे कौतुक करण्यात येत आहे. 
तर दुसरीकडे अक्षय शिंदेच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, अक्षयला तळोजा कारागृहातून बदलापूरला हलविण्याआधी त्याचे कुटुंब त्याला भेटले होते, असे अक्षय शिंदेच्या कुटुंबीयांनी वारंवार माध्यमांसमोर सांगितले आहे.
अक्षयची बनावट चकमकीत हत्या केली गेली असून हे एन्काउंटर बनावट आहे, असे मत अक्षयच्या वडिलांनी व्यक्त केले आहे. 
तसेच आता त्यांनी या प्रकरणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. यावेळी उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एसआयटी चौकशीची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे. अक्षयच्या एन्काउंटरचे राजकीय लाभार्थी कोण? असा सवाल उपस्थित करत याचिकेमध्ये एन्काउंटरच्या राजकीय लाभार्थ्यांची चौकशी करण्याची मागणी केली. अक्षय शिंदेच्या एन्काउंटरसह शाळेतील लैंगिक अत्याचाराचीदेखील नव्याने चौकशीची व्हावी, असे या याचिकेत म्हटले आहे.

Related Articles

Back to top button