मनोरंजन

‘रंगीला गर्ल’चा आठ वर्षांत मोडला संसार

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. उर्मिला कायमच तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहीली आहे. आता उर्मिलाने घटस्फोटासाठी अर्ज केल्याची बातमी समोर येत आहे. तिने बिझनेसमन, मॉडेल मोहसिन अख्तर मीरसोबतचा आठ वर्षांचा संसार मोडला आहे. त्यांनी मुंबईतील कोर्टात घटस्फोटाची याचिका दाखल केल्याची माहिती समोर येत आहे.

उर्मिला आणि मोहसिन यांनी २०१६ मध्ये लग्न केले होते. आता लग्नाच्या आठ वर्षांनंतर उर्मिलाने कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. उर्मिलाने बराच विचार करून हा निर्णय घेतला आहे. मात्र, घटस्फोटाचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

उर्मिला आणि मोहसीन यांनी अतिशय खासगी पद्धतीने विवाह केला. या विवाह सोहळ्याला केवळ कुटुंबीय आणि जवळच्या मित्र परिवाराला आमंत्रण देण्यात आले होते. त्यामध्ये चित्रपटसृष्टीतील काही लोकांचादेखील समावेश होता. दोघांचे लग्न झाले, तेव्हा त्यांच्या वेगळ्या धर्माची आणि वयाच्या अंतराची बरीच चर्चा झाली होती. खरे तर उर्मिला मोहसीनपेक्षा दहा वर्षांनी मोठी होती. आता त्यांच्या लग्नाला आठ वर्षे झाली आहे. इतकी वर्षे एकत्र राहिल्यानंतर त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे.

Related Articles

Back to top button