क्राईम

ब्रेकिंग! अक्षय शिंदेच्या मृत्यूचे खरे कारण समोर

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. पोलिसांनी स्वरक्षणासाठी हा एन्काऊंटर केल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात येत आहेत. 
याप्रकरणी विरोधकांकडून अनेक दावे-प्रतिदावे केले जात असताना आता अक्षय शिंदेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? याचे उत्तर समोर आले आहे. एन्काऊंटरमध्ये बंदुकीची गोळी लागल्याने अक्षय शिंदेच्या मृतदेहातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आली आहे.
बदलापुरमधील नामंकित शाळेतील दोन चिमुरड्या विद्यार्थीनींवर अत्याचार केल्याप्रकरणी अक्षय याला अटक करण्यात आली होती. अक्षय याच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु होता. तपास पूर्ण करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयाची ट्रान्सफर ऑर्डर घेऊन आरोपीचा तळोजा कारागृहामधून ताबा घेतला होता. 
पोलिस व्हॅनमध्ये अक्षयला घेऊन जात असताना त्याने पोलिसांची बंदूक हिसकावत पोलिसांवर जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार घडला. यावेळी स्वरक्षणासाठी पोलिसांनी केलेल्या चकमकीत अक्षय ठार झाला.

Related Articles

Back to top button