राजकीय
ब्रेकिंग! काँग्रेसची यादी कधी जाहीर होणार? सस्पेन्स वाढला

- राज्यात पुढील महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या दृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी केली जात आहे. यंदाची विधानसभा निवडणूक अटीतटीची होईल, असा अंदाज आहे. दरम्यान, अद्यापही महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा जागावाटपाचा तिढा सुटत नसल्याचे दिसून येत आहे. एकीकडे महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांकडून आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली, तर दुसरीकडे काँग्रेसकडून अद्याप उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली नाही. काँग्रेसच्या उमेदवारांची यादी कधी जाहीर होणार, याबाबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले असून उद्या रात्री काँग्रेसची यादी होणार असल्याचे पटोले म्हणाले. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये थोड्या जागांवरुन घोळ सुरु आहे. हा घोळ आज निकाली काढायचा असून त्यानंतर काँग्रेसच्या उमेदवारांची यादी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर उद्या दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडल्यानंतर रात्री उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार असल्याचे पटोले यांनी सांगितले.
- तसेच जागावाटपाच्या मुदद्यावरुन महाविकास आघाडीसह महायुतीमध्येही अडचणी सुरु आहेत. आघाडी युती असली की अडचणी येतच असतात. हे राजकारणामध्ये सुरुच असते, असेही पटोले म्हणाले.