क्राईम

ब्रेकिंग! अक्षय शिंदेचा एन्काऊंटर, बदलापुरात जल्लोष

बदलापूर येथे शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार करणारा मुख्य आरोपी अक्षय शिंदेची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली होती. याचदरम्यान अक्षय याला पोलीस ट्रान्सिट रिमांडसाठी नेत असताना त्याने पोलिसांवर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला.
यामध्ये त्याचा मृत्यू झालाआहे. दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
यावर विरोधी पक्षातून टीका होत असतानाच ठाणे पोलिसांचे अभिनंदन करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरसावली आहे. मनसेचे आमदार राजू पाटील यांनी या एन्काऊन्टरनंतर पोलिसांचे अभिनंदन केले आहे.
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर ! या अभंगाचा दाखला देत राजू पाटील म्हणतात, बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी गोळ्या झाडून एन्काऊंटर केला. कोणी कितीही काहीही बोललं तरी आमच्या सर्वांच्या मनात हेच आहे, त्याने केलेल्या चुकीची शिक्षा त्याला अखेर मिळालीच आणि आमच्या चिमुकल्यांना न्याय मिळाला.ठाणे पोलिसांचे मनापासून अभिनंदन !
दरम्यान अक्षय शिंदेच्या एन्काऊन्टरनंतर बदलापूरमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. बदलापूरकरांनी फटाके फोडत तसंच एकमेकांना पेढे भरवत या एन्काऊन्टरचा आनंद व्यक्त केला.

Related Articles

Back to top button