क्राईम

ब्रेकिंग! बदलापूर अत्याचार प्रकरणात नवी घडामोड

बदलापुरातील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार प्रकरणाने राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांनी एन्काउंटर केल्यानंतर विरोधकांकडून शाळेच्या ट्रस्टींना वाचवण्यात येत असल्याचा आरोप होत होता. अटक टाळण्यासाठी शाळेचे संस्थापक अध्यक्ष व सचिवांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्याच्या दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तुषार आपटे आणि उदय कोतवाल असे ताब्यात घेण्यात आलेल्या शाळेच्या ट्रस्टींचे नाव आहे. दोन्ही ट्रस्टींना गुन्हे अन्वेशष विभागाने ताब्यात घेतले असून त्यांना उद्या कल्याण कोर्टात हजर केले जाणार आहे.
कर्जत परिसरातून या दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहे. गेल्या जवळपास दीड महिन्यांपासून हे दोघेही लपून बसले होते. अखेरीस पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. 

Related Articles

Back to top button