क्राईम
पुण्यात पुन्हा हैदोस!

- पुणे शहर पुन्हा एकदा कोयता गँगच्या दहशतीखाली गेले आहे. कोंढवा परिसरातील लक्ष्मीनगरमध्ये पहाटेच्या सुमारास एका टोळक्याने धारदार शस्त्रांसह वाहनांची तोडफोड केली. यामध्ये नऊ दुचाकी, दोन रिक्षा आणि एक चारचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.
- या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या धक्कादायक प्रकारानंतर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
- या घटनेमुळे पुण्यात कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. कोंढवा सारख्या दाट लोकवस्तीच्या परिसरात भररस्त्यावर नंग्या तलवारी फिरवल्या जात आहेत, हे चिंतेचे कारण ठरत आहे.