सोलापूर
आमदार विजयकुमार देशमुख यांना धडा शिकवण्याची हीच वेळ

- सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्यावतीने तुतारी चिन्हावर महेश कोठे हे निवडणूक लढवत आहेत. महेश कोठे यांना सर्वच स्तरातून मोठया प्रमाणात पाठींबा मिळत आहे. गेल्या वीस वर्षांत आमदाराने काहीच केले नाही आणि बेरोजगारी हा प्रमुख मुद्दा युवक आता बोलून दाखवत आहेत, दरम्यान शनिवारी सकाळी पाणिवेस गणपती मंडळाच्या गणपतीची पूजा महेश कोठे यांच्या हस्ते पार पडली, यावेळी मंडळाच्यावतीने कोठे यांचा सत्कार करण्यात आला,
- यावेळी विचार व्यक्त करताना पाणिवेस येथील कार्यकर्त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली, गेली वीस वर्षे आम्ही ज्यांच्याकडे होतो त्यांनी वीस वर्षांत आमच्या युवकांसाठी काहीच केलं नाही, नोकरी नाही कोणताही व्यवसाय आणू शकले नाही, त्यामुळे आमच्या भागात बेरोजगारी मोठया प्रमाणात वाढली, त्यामुळे आता नाईलाजाने आम्हाला आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात जाऊन काम करावे लागत आहे
- आता युवक पेटून उठला आहे, मी किमान आयटी पार्क आणण्यासाठी प्रयत्न तर सुरू केले आहेत, तुम्ही वीस वर्षांत काय केले हे सांगावे, लोकांना खोटे आश्वासन देऊन फसवणूक करण्याचे बंद करा आता लोक जागरूक झाले आहेत, आता लोकांनी चार दिवस जागरूक राहून दाखवलं पाहिजे आम्ही जर डोक्यावर घेऊ शकतो तस पायाखाली देखील घेऊ शकतो अशी टीका महेश कोठे यांनी विजयकुमार देशमुखांवर केली.