पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. गणेश विसर्जनाच्या अगोदर नाना पेठेत एका तरुणाचा गोळ्या झाडून खून करण्यात आला आहे. यामध्ये हल्लेखोरांनी तीन गोळ्या झाडल्या. त्यामध्ये तरुणाचा जाग्यावरच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, मृताचे नाव गोविंदा गणेश कोमकर आहे. (Pune) गणेश हा वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी संजीवनी कोमकरचा पुतण्या आहे. गणेश कोमकर हा देखील आरोपी असुन तो तुरुंगात आहे. संजीवनी ही वनराजची सख्खी बहीण आहे. वनराज आंदेकरांच्या हत्येनंतर पुण्यातील टोळीयुद्ध भडकण्याची भीती होती पुण्याच्या गुन्हेगारी विश्वात आंदेकर कुटुंबाचा रंक्तरंजित इतिहास तब्ब्ल पाच दशकांचा आहे. त्यामुळे वनराज आंदेकरांच्या हत्येनंतर पुण्यातील टोळीयुद्ध भडकण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती.
आज पुण्यातील नाना पेठेतील श्री लक्ष्मी कॉम्लेक्समध्ये पार्किंगमध्ये तीन ते चार जण आले. त्यांनी गोळीबार केला, यात आयुष कोमकर जखमी झाला. त्यानंतर त्याला ससून रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, त्यात आयुष उर्फ गोविंद कोमकरचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील नाना पेठ आणि आजू बाजूच्या परिसरात तणावाचे वातावरण आहे.