- सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याच्या पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोनवरून दमदाटी केल्याचा आरोप होत आहे. या संभाषणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या प्रकारावरून विरोधकांनी अजितदादांवर टीकेची झोड उठवली आहे. अवैध मुरुम उत्खनन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी गेलेल्या आयपीएस अधिकाऱ्याला अजितदादांनी दमदाटी केली. यावेळी त्यांच्या पक्षाच्या एका कार्यकर्त्याने अजितदादांना फोन केला. दरम्यान, या सर्व प्रकरणावर अजितदादांनी ट्विट करत भूमिका मांडली. त्याठिकाणी परिस्थिती शांत राहावी हाच उद्देश होता, असे अजितदादांनी म्हटले.
- अजित पवारांचे स्पष्टीकरण काय?
- सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहेत. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत रहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी…
IPS महिला अधिकाऱ्याला झाप झापले
