क्राईम

बॉयफ्रेंडला सोबत घेऊन नवऱ्याचा केला गेम

  • एका विवाहित महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. तिने पतीचा मृत्यू औषधांच्या अतिसेवनामुळे झाल्याचा बनाव रचला होता. यासाठी तिने मृत पतीच्या खिशात शक्तीवर्धक गोळ्यांचे आठ रिकामे पाकिटे ठेवली होती. मात्र, पोस्टमार्टम रिपोर्टने या हत्येचा उलगडा केला आणि पत्नीचा खोटा बनाव उघडकीस आला.
  • ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील कानपूरच्या बिठूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. आबिद अली असे मृत पतीचे नाव असून तो पत्नी शबाना आणि मुलासोबत राहत होता. १९ जानेवारीला शबानाने पोलिसांना कळवले की, तिच्या पतीचा मृत्यू शक्तीवर्धक औषधांच्या अतिसेवनामुळे झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. आबिदच्या खिशात शक्तीवर्धक गोळ्यांचे रिकामे पाकिटे सापडल्याने पोलिसांनाही सुरुवातीला शबानाच्या बोलण्यावर विश्वास बसला. पण शरीरावर कोणत्याही जखमा नसल्याने पोलिसांचा संशय अधिकच कमी झाला. आबिदच्या मृत्यूवर शबानाने खूप शोक व्यक्त केला, ज्यामुळे ती दुःखात असल्याचा आभास निर्माण झाला. दरम्यान, पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
  • दुसऱ्या दिवशी आलेल्या पोस्टमार्टम रिपोर्टने मात्र सर्वांनाच हादरवून सोडले. अहवालात आबिदचा मृत्यू गळा दाबल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. यामुळे औषधांच्या अतिसेवनाचा बनाव उघडकीस आला.
  • पोलिसांनी शबानाची कसून चौकशी सुरू केली. तिच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स तपासले असता, त्या रात्री तिचे रेहान नावाच्या युवकासोबत संभाषण झाल्याचे आढळून आले. पोलिसांनी रेहानला ताब्यात घेऊन चौकशी केली असता संपूर्ण कट उघडकीस आला.
  • शबाना आणि रेहानची मैत्री वर्षभरापूर्वी सोशल मीडियावर झाली होती. आबिद घरी नसताना रेहान शबानाला भेटायला येत असे. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. आबिदला याचा संशय आल्याने त्याने विरोध केला. त्यानंतर दोघांनी मिळून आबिदला मार्गातून हटवण्याचा कट रचला.
  • गुन्ह्याच्या रात्री आबिद झोपल्यानंतर शबानाने रेहान आणि त्याचा मित्र विकासला घरी बोलावले. त्यानंतर तिघांनी मिळून आबिदचा गळा दाबून खून केला. हत्येचा संशय येऊ नये म्हणून त्यांनी शक्तीवर्धक गोळ्यांच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाल्याचा बनाव रचला. पोलिसांनी शबाना, रेहान आणि विकास या तिघांनाही अटक केली आहे.

Related Articles

Back to top button